Ad will apear here
Next
हाच माझा मार्ग
'साऊंड, कॅमेरा, ॲक्शन!' दिग्दर्शकाने सूचना देताच त्याने भोकाड पसरलं. सचिन चित्रपटसृष्टीत अगदी 'त्या वयापासून' आहे.
बाल कलाकार के मुख्य अभिनेता, संकलक ते दिग्दर्शक असा प्रवास करत; हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी गाजवत सचिनचा हा प्रवास सुरू राहिला.
'सचिन, माझी अशी इच्छा आहे की, आमच्या कंपनीसाठी तू एक फिल्म "डिरेक्ट" करावीस.’ खुद्द व्ही शांताराम यांच्याकडून सचिनला चित्रपट दिग्दर्शनाची संधी आली. सचिन 'नाही' म्हणणं शक्य नव्हतं. त्यावेळी त्याच्याकडे 'आत्मविश्वास' या चित्रपटाची पटकथा तयार होती.
'पण आम्हाला विनोदी चित्रपट बनवायचाय!' अण्णांचे चिरंजीव किरण शांताराम यांनी सांगितलं व सचिनचा आत्मविश्वास बाजूला पडला.
अशोक सराफला घेऊन 'आमच्यासारखे आम्हीच' या दुसऱ्या एका चित्रपटाची कल्पना सचिनच्या डोक्यात होती.
'आमच्या या चित्रपटात 'सुशांत रे' हवाय. आम्ही त्याला 'प्रॉमिस' केलं आहे,' किरणने दुसरी अट मांडली. सुशांत रे अण्णांचा नातू.
'तुम्ही अटी मांडणार असाल तर मला पिक्चर करायचा नाहीये,' सचिनने किरणला स्पष्ट सांगितलं. पण सचिनला अण्णांना नाराजही करायचं नव्हतं.
ऋषिकेश मुखर्जी यांनी खूप वर्षांपूर्वी चार मित्रांच्या गोष्टीवर एक चित्रपट बनवला होता. सचिनने ॠषिदांना त्या विषयावर चित्रपट बनवायची परवानगी मागितली.
'तो एक फ्लाॅप विषय आहे. त्यावर चित्रपट बनवू नकोस,' ॠषिदांनी सांगितलं पण आपल्या 'गट फिलिंग्ज'वर विश्वास ठेवत सचिनने त्याच विषयावर चित्रपट बनवायचं ठरवलं.
'अण्णा, मी तुम्हाला चित्रपटाची एकही 'रश प्रिंट' दाखवणार नाही. चित्रपट सेन्साॅरला जाण्याअगोदरची 'मॅरीड प्रिंट' दाखवणार!' आता सचिनने अण्णांना अट घातली.
अण्णांना त्यांच्या कामात कुणी ढवळाढवळ केलेली आवडत नसे. सचिनने तीच मागणी करताच, निर्माते म्हणून चित्रपट निर्मितीचा जुगार खेळत असतानाही, दिग्दर्शक सचिनची अट त्यांनी मान्य केली.
'हृदयी वसंत फुलताना...' हे गाणं अप्रतिम बनलं होतं. किरणने अण्णांना ते गाणं पाहण्यासाठी आग्रह केला. पण 'सचिनच्या कामात कसलीच दखल द्यायची नाही' म्हणून अण्णांनी गाणं पाहायला नकार दिला
चित्रपटात अशोक सराफ बरोबर लक्ष्मीकांत बेर्डेही होता. इतर कलाकारही तितकेच ताकदीचे होते.
'कुणीतरी येणार, येणार गंऽ' गाण्याच्या शूटिंगसाठी प्रशस्त गच्ची हवी होती. राजकमल स्टुडिओमधील इमारतीला तशी गच्ची होती पण नेमकी अण्णांच्या बेडरूमवर! गाण्याचं शूटिंग तीन रात्री चालणार होतं. अण्णांनी गच्चीवर शूटिंगला परवानगी तर दिलीच पण त्यासाठी तीन रात्री जागूनही काढल्या.
'काय, माझ्या डोक्यावरच नाचलास? आनंद मिळाला ना तुला?’ गाणं शूट झाल्यावर अण्णांनी सचिनची फिरकी घेतली व सचिनही नम्रपणे हसला.
अशी ही 'बनवाबनवी' तयार झाली. राजकमल स्टुडिओत चित्रपटाचा त्याचा ट्रायल शो ठेवला होता. अण्णांसारख्या महान दिग्दर्शकाचं कसलंही मार्गदर्शन न घेता सचिनने स्वतःच्या हिंमतीवर चित्रपट बनवला होता.
या ट्रायल शोसाठी सचिन व अण्णांचे कुटुंबीय उपस्थित होते तसेच इतर निमंत्रित मंडळीत चित्रपटांचे जाणकारही होते.
विनोदी चित्रपटासाठी वातावरण निर्मिती व्हायला हवी. पण अण्णांसारखी गंभीर प्रकृतीची व्यक्ती थिएटरमध्ये उपस्थित असल्याने प्रेक्षकांवर दडपण आलं.
चौघांची बनवाबनवी सुरू झाली. एकामागोमाग एक 'पंचेस' येत होते पण कुणी हसत नव्हतं. सचिनला टेन्शन आलं.
आणि मग ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ हे दृश्य सुरू झालं आणि हसू न आवरल्याने अण्णा अक्षरशः सीटवरून खाली पडले. त्यानंतर तिथे जो हशा सुरू झाला तो शेवटपर्यंत थांबला नाही.
- विजय निंबाळकर, लोहगाव - पुणे हाच माझा मार्ग हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉम वरून २५% सवलतीत घरपोच मागवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZQDDF
Similar Posts
कोल्हाट्याचं पोर किशोरचा बाप करमाळ्याचा आमदार नामदेवराव जगताप. किशोरच्या लहान भावाच्या बाप मराठवाड्यातला धारूरकर नावाचा वयस्कर माणूस. आणि आता किशोरची आई सोनपेठमधला कृष्णराव वडकर या सावकाराला 'मालक' करून बसलेली. अशा बाईला आई तरी कसं म्हणायचं? पण कोल्हाट्याच्या बायकांचं जीवन असंच असतं. विशेषतः गावोगावच्या पार्टीत नाचणाऱ्या बायकांचं
बलुतं पुरुषांनी रांडबाजी करणं म्हणजे छातीवर मेडल अडकवणं. मारूतीच्या दृष्टीने तोच खरा पुरुषार्थ. तसंही आता कुठं लढाया होताहेत?
चौंडकं दोन दोन आठवडे आंघोळ न करणाऱ्या सुलीच्या डोक्यात एक जट दिसते म्हणून आई व आजी तिला गावातल्या जोगतीणीकडे घेऊन जातात. 'यल्लूमाई तुमच्या घरी आली!' जोगतीण 'डोंगरावरच्या देवीला घरात आणायला' आणि 'घरातल्या निष्पाप पोरीला देवीला वाहायला' सांगते. सुलीचा बाप विरोध करतो म्हणून म्हातारी व सुलीची आई महिनाभर त्याच्याशी
तोत्तोचान अंगावर एकही कपडा न घालता तलावात पोहायचं? आई तर पोहण्याचा पोशाख घातल्याशिवाय तलावाजवळ जाऊही देत नाही. आणि इथे मुख्याध्यापक म्हणताहेत की शाळेतल्या सर्व मुलांनी बिनकपड्याचं पोहायचं!

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language